संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान लाओस देशाच्या दौऱ्यावर जाणार असून तिथं ते आसियान संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यांवर ते परिषदेत मार्गदर्शन करतील. ते अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, लाओस, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपाइन्स आणि दक्षिण कोरिया या देशांच्या संरक्षणमंत्र्यांशीही ते परिषदेदरम्यान द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत.