सरहद्दीवरच्या पायाभूत सुविधांमधे लक्षणीय योगदान देणाऱ्या ७५ विविध विकासप्रकल्पांचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने आज झालं. सीमा रस्ते विकास संघटनेमार्फत हे प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यावर सुमारे २ हजार २३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात २२ रस्ते, ५१ पूल आणि अन्य २ प्रकल्पांचा समावेश आहे. सीमेलगतची ११ राज्यं आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहांवर हे प्रकल्प उभे राहणार आहेत.
संरक्षण मंत्र्यांनी आज दार्जिलिंग इथं शस्त्रपूजन केलं तसंच लष्करी जवानांबरोबर दसरा साजरा केला.