राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी, राधाकृष्णन यांनी आज राजभवनात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. राष्ट्रमाता जिजाऊचं जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सिदखेडराजा इथं केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्निक महापुजा केली.
परभणीतल्या जिजाऊ मंदीरात काल म्हणजे जन्मोत्सवच्या पुर्वसंध्येला दीपोत्सव साजरा झाला तसंच आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं.
जालना शहरात सर्वपक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी केली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे, आमदार अर्जुन खोतकर तसंच नागरिक यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात सहाय्यक अधीक्षकानी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. विविध उपक्रमांद्वारे सुरु असलेल्या कार्यातून प्रेरणा घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
बीड शहरात राजमाता जिजाऊंच्या अर्धाकृती पुतळ्याला नागरिकांनी अभिवादन केलं. यावेळी लेझीम पथकाचा कार्यक्रमही झाला.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन केलं. यावेळी नायब तहसीलदार तसंच जिल्हाधिकारी कार्यालयातले कर्मचारी उपस्थित होते