राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या दिवशी संध्याकाळी जाहीर झालेली आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी जाहीर झालेली आकडेवारी यात तफावत होती. पण त्यात कुठलीही फेरफार झाली नसल्याचा निर्वाळा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला. मतदानाची आकडेवारी बदलणे अशक्य आहे. काही मतदान केंद्रांवरुन अधिकारी कर्मचारी रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी पोहोचतात. प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधीला दिलेल्या १७ सी या अर्जातली मतदानाची आकडेवारी मतमोजणीच्या वेळी पडताळून दाखवली जाते, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
Site Admin | January 7, 2025 8:14 PM
मतदानाची आकडेवारी बदलणे अशक्य-मुख्य निवडणूक आयुक्त
