राजस्थानमधे सीकर जिल्ह्यात एका खाजगी प्रवासी बसला झालेल्या अपघातात १२ जण ठार तर २५ पेक्षा जास्त जण जखमी झाले. ही बस सालासर इथून नवलगडकडे जात होती. आज दुपारी बस लक्ष्मणगड इथून जात असताना च्या वेळी बसचालकाचे वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि ती पुलावर आदळली. अपघातातल्या काही जखमीना जयपूर इथं तर, काहींना सीकर इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.