भारताच्या विज्ञान क्षेत्रात मत्त्ववपूर्ण योगदान देणारे विख्यात भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या कारकीर्दीत सांभाळल्या.डॉ. चिदंबरम हे भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे प्रमुख रचनाकार होते , तसंच त्यांनी पोखरण-I आणि पोखरण-2 या चाचण्यांमध्ये मोलाची भूमिका बजावली.
चिदंबरम यांना 1975 मध्ये पद्मश्री आणि 1999 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत.