राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवला जात आहे अशी खंत नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर इथे ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेचा समारोप झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आपली भूमिका मांडत होते. महाराष्ट्रात उपलब्ध संधीचा सुयोग्य वापर केला तर आरक्षणाची गरज पडणार नाही असं सांगत आरक्षण हे आर्थिक निकषांवर द्यावं या मागणीचा पुनरूच्चार ठाकरे यांनी परिषदेत केला. तसंच आपल्याकडे विस्थापितांची फौज असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला.
Site Admin | August 10, 2024 7:08 PM