मुंबईत टोलमुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेल्या आंदोलना दरम्यान मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या तक्रारी मागे घेतल्या पाहिजेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. आज ते ठाण्यात वार्ताहरांशी बोलत होते. गेली अनेक वर्ष जी टोलवसुली सुरु होती त्यातून नक्की किती पैसे गोळा झाले याचा कोणताही हिशोब नाही नसल्याचं ते म्हणाले. इतक्या वर्षांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे.
Site Admin | October 18, 2024 8:05 PM | मनसे अध्यक्ष | राज ठाकरे
टोलमुक्तीसाठी मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या तक्रारी मागे घेण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागणी
