डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 14, 2024 4:15 PM | derecter | raj kapoor

printer

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरुवात

‘दि ग्रेट शोमन’ या नावानं परिचित असलेल्या चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरुवात झाली. भारतीय चित्रपट विश्वाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाण्यात राज कपूर यांचा मोठा वाटा आहे. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक आशयही वृद्धिंगत करण्यात त्यांच्या चित्रपटांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. केवळ भारतातच नव्हे तर विशषत्वाने रशियासह जगभरातल्या चित्रपट रसिकांनी राज कपूर यांच्या चित्रपटांना अखंड दाद दिली आहे. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनासह अभिनेता या रूपातही त्यांनी रसिकांना अपार आनंद दिला. राज कपूर यांच्या देदीप्यमान कारकिर्दीबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. भारतीय चित्रपटसृष्टीतले स्टार म्हणून दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर ही त्रिमूर्ती बराच काळ किर्तीच्या शिखरावर आरूढ राहिली. २ जून १९८८ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी राज कपूर यांनी इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या जाण्याने केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर संपूर्ण मनोरंजन विश्व पोरकं झालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा