प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन करणार आहेत. या संवादाचं हे दहावं वर्ष आहे. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झन हे या संवादाच्या उद्घाटनाच्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि उपस्थितांशी संवाद साधतील. उद्यापासून १९ तारखेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. यंदा रायसीना संवादाची मध्यवर्ती संकल्पना ‘कालचक्र – नागरिक, शांतता आणि पृथ्वी’ अशी आहे. यंदा या कार्यक्रमात १२५ देशांमधून विविध क्षेत्रांमधले आघाडीचे नागरिक सहभागी होणार आहेत. यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी नवी दिल्लीला पोहोचत आहेत.
Site Admin | March 16, 2025 6:29 PM | PM Narendra Modi | Raisina Dialogue 2025
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन करणार
