डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ख्रिस्तोफर लक्झन यांच्या हस्ते रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन

भारत आणि न्युझीलंडच्या आर्थिक प्रगतिकरता दोन्ही देशांनी एकमेकांशी तंत्रज्ञानाची देवाण घेवाण करणं गरजेचं असल्याचं मत न्यू झिलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्सन यांनी केलं आहे. रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ख्रिस्तोफर लक्झन यांच्या हस्ते झालं. त्यानंतर ते बोलत होते.गेल्या २०० वर्षांपासून भारत आणि न्युझीलंडचे नागरिक उद्योग आणि संस्कृतीची आदान प्रदान करत आहेत, आणि आजही विविध क्षेत्रात सहकार्य वृद्धीसाठी दोन्ही देश कार्यरत असल्याचं लक्झन यावेळी म्हणाले. औषध निर्मिती आणि यंत्रांसाठी आज भारत न्यु-झीलंडचा मोठा स्रोत आहे. तसंच पर्यटनासाठी न्यु-झीलंडच्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक येत असतात, असंही लक्सन म्हणाले. दोन्ही देशांमध्ये अतिशय सक्षम मनुष्यबळ आहे आणि परस्पर समृद्धीसाठी कार्यरत राहू असं ते म्हणाले. जगभरात अर्थकारणापेक्षा सुरक्षेला अधिक प्राधान्य दिलं जातं आहे. त्याचवेळी सार्वभौमिकता जपण्याला आम्ही प्राधान्य देऊ, असं त्यांनी सांगितलं. 

 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. लक्झन यांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यादरम्यान बुधवारी ते मुंबईलाही भेट देणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा