येत्या दोन दिवसात विदर्भात बहुतांश ठिकाणी, कोकणात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.