विदर्भात काही ठिकाणी काल उष्णतेची लाट होती. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रात्रीच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर राज्यात इतर ठिकाणी ते काहीसं वाढलं होतं. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Site Admin | March 17, 2025 8:05 PM | IMD | Rain
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता
