बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज मात्र पावसानं हजेरी लावल्यानं पुन्हा गारवा वाढला आहे. थंडीतला पाऊस आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यानी केलं आहे.
सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथंही आज संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.