गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
येत्या २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस पडेल, तर संध्याकाळी किंवा रात्री काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे.