छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यावर पोहोचला असून धरणाच्या १८ दरवाजांमधून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर तर बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. लातूर जिल्ह्यातल्या तेरणा, मांजरा आणि रेणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यापैकी रेणापूर मध्यम प्रकल्पातून रेणा नदीपात्रात विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले असून त्यातून २९ हजार ८०५ क्युसेक्स वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातल्या कण्हेर आणि उरमोडी धरणातून आज सकाळपासून विसर्ग करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातही अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे.