येत्या दोन ते तीन दिवसांत देशाच्या ईशान्येकडल्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
बांगलादेशाच्या दक्षिण भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हे क्षेत्र उत्तर तसंच वायव्य दिशेला जाण्याची शक्यता असून त्यामुळे पश्चिम बंगालच्या गांगे भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल. यामुळे ओदिसा, झारखंड, बिहार, सिक्किम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरात मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्विप इथं ही पुढचे दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
या आठवड्यात राजधानी दिल्लीतही हवामान ढगाळ राहिल आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.