डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 4, 2024 7:08 PM | Ashwini Vaishnav

printer

रेल्वेचं खासगीकरण होणार नाही- रेल्वेमंत्री

 

कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ते आज नाशिकमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या चाळिसाव्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात संचलनाचं निरीक्षण केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. रेल्वे सुरक्षा बलाच्या विभागीय प्रशिक्षण केंद्रांसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही वैष्णव यांनी केली. या केंद्रांमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या सोयीसुविधांवर विशेष भर देण्यात येणार आहे. याशिवाय रेल्वे सुरक्षा बलाच्या तमिळनाडू इथल्या श्वानपथक विभागीय प्रशिक्षण केंद्रासाठी साडेपाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही त्यांनी मंजूर केला.

 

अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमात रेल्वे सुरक्षा बलाच्या ३३ कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदकं आणि जीवन रक्षा पदकंही प्रदान केली. रेल्वे सुरक्षा दलानं सुरक्षेच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञानाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतल्याचं सांगून वैष्णव यांनी त्यांचं कौतुककेलं. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेलमार्गात नारायणपूर इथं २३ देशांनी उभारलेल्या दुर्बिण क्षेत्राचा अडथळा येत असून त्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचं काम सुरू असल्याची ग्वाही वैष्णव यांनी दिली. नाशिक, लासलगाव आणि नांदगावसह १३२ रेल्वेस्थानकांचं पुनर्निर्माण होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा