रेल्वे सुधारणा विधेयक २०२४ वर आज लोकसभेत चर्चा झाली. या विधेयकामुळे रेल्वे क्षेत्रात कार्यक्षमता वाढीस लागेल, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधेयकावर चर्चा करताना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेमध्ये प्रगती आणि परिवर्तन झाल्याचं वैेष्णव म्हणाले. रेल्वेचा अर्थसंकल्प आधीपेक्षा वाढून ५२ हजार कोटी इतका झाला असून गेल्या दहा वर्षांत ४४ हजार किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण झालं आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. तर काँग्रेसच्या मनोज कुमार यांनी नव्या विधेयकामुळे रेल्वेचं खासगीकरण होण्याची भिती व्यक्त केली. वंदे भारत गाड्यांमध्ये तिकीटाच्या जास्त दराचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.