पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सायंकाळी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली, तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये रेल्वेमंत्र्यांनी मदत जाहीर केली. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडे जाणाऱ्या मार्गावरच्या अनेक रेल्वेगाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल सकाळी झालेल्या या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्रीमोदी यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्रीराष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.