नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरच्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. दुर्घटनेच्या वेळी बचावकार्याऐवजी सरकार आकडे लपवण्यात गुंतलं होतं असा आरोप त्यांनी केला. दुर्घटनेच्या आधी तासाभरात पंधराशेहून अधिक तिकिटं विकली गेली होती, त्यामुळे रेल्वेला गर्दीचा अंदाज यायला हवा होता असं त्या म्हणाल्या.
Site Admin | February 16, 2025 3:43 PM | Congress | Railway Minister Ashwini Vaishnav
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी
