डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे २३८०० कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यात रेल्वेसाठी एकंदर २३ हजार ७७८ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. राज्यात एकंदर १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं काम सुरू असल्याचंही त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार या प्रकल्पांमधला राज्याचा वाटा रिझर्व्ह बँक उचलणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

 

अमृत स्थानक योजनेअंतर्गत राज्यातली नवी १३२ स्थानकं विकसित केली जाणार आहेत. गेल्या १० वर्षात राज्यात एकवीसशे किलोमीटर लांबीचे नवे रेल्वेमार्ग तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. 

 

मुंबईतल्या मुंबई सेंट्रल, वांद्रे, जोगेश्वरी, वसई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, परळ, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, पनवेल या टर्मिनलची क्षमता वाढवण्यात येणार आहे. याशिवाय तुमसर, वडसा, आमगाव, कळमना या स्थानकांत गोदाम सुरू करणार असल्याचं ते म्हणाले. 

 

कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी सात ते आठ स्थानकांवर उच्चश्रेणी विश्रामगृह उभारली जातील. ती ताशी ५० रुपये शुल्क देऊन प्रवाशांना वापरता येतील असं कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोषकुमार झा यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा