महाराष्ट्रात रेल्वे विकासाकरता १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपयांची आणि मेट्रो मध्ये १ लाख १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राज्यातल्या १३२ स्टेशनचा अमृत भारत अंतर्गत विकास सुरू आहे. मुंबईत ३२० किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग टाकले जात आहेत. त्यासाठी १६ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होत आहे. याशिवाय मनोरंजन क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ यावं यासाठी Indian Institute of Creative Technology ची स्थापना करायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. यातली पाहिली संस्था मुंबईत सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Site Admin | November 16, 2024 8:18 PM | Railway minister Ashwini Vaishnaw