डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 19, 2025 8:59 PM | Railway Exam

printer

रेल्वेच्या विभागीय परीक्षांशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी पाच अधिकाऱ्यांना अटक

रेल्वेच्या विभागीय परीक्षांशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं पश्चिम रेल्वेच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली. बडोदा आणि अमदाबादमधून प्रत्येकी २ आणि मुंबईत एकाला अटक झाली आहे. रेल्वेच्या कार्मिक विभागातील दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.  परीक्षार्थींकडून लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बडोद्यात ११ ठिकाणी छापे घातले. त्यात ६५० ग्रॅम सोने आणि ५ लाख रुपये रोख रक्कम ताब्यात घेतल्याची माहिती प्रवक्त्यानं दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा