भारतीय रेल्वेनं महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या असून येत्या दीड ते दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, त्यासंबंधीचं कार्य वेगानं सुरु आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. प्रत्येक रेल्वे विभागात, परिमंडळात आणि रेल्वे मंडळात वॉर रूम स्थापन केल्या असून त्यांवर नियमित देखभाल केली जात आहे. रेल्वे संरक्षण दलात एकूण मनुष्यबळापैकी ९ पूर्णांक ४ दशांश टक्के महिला कार्यरत असल्याचं त्यांची सांगितलं.
Site Admin | April 2, 2025 3:36 PM | Indian Railway
येत्या दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे कॅमेरे बसवले जातील -रेल्वेमंत्री
