आंध्रप्रदेशात विशाखापट्ट्णम इथं पाकिस्तानच्या हेरगिरीप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले. गुजरात, कर्नाटक, केरळ, तेलंगण, उत्तरप्रदेश, बिहार, आणि हरयाणामधे मिळून १६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत २२ मोबाईल फोन्स, आणि अनेक गोपनीय कागदपत्रं मिळाली असल्याचं एनआयीएने सांगितलं. भारतीय नौदलासंबंधी महत्वाची आणि गोपनीय माहिती चोरणं आणि भारत विरोधी कारस्थान करणं या आरोपांखाली एनआयए ने गेल्यावर्षी दोन जणांवर आरोपपत्र दाखल केलं आहे.