डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरील कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याचा काँग्रेसचा आरोप

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय – ईडीने काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या प्रकरणी या दोन नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपनं काँग्रेसवर टीका केली असूनची काँग्रेसचा आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस सरकारच्या काळातच हा खटला दाखल झाला असून, त्यावर राजकारण करण्याचा कोणताही अधिकार काँग्रेसला नाही, असं भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी यावेळी बोलताना, काँग्रेस पक्षाकडून ईडीला धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. यंग इंडिया संघटनेच्या नावाखाली पक्षाने बेकायदेशीरपणे जमीन मिळवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा