डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उद्योगपतींच्या माफ झालेल्या कर्जाइतकी रक्कम राज्याला देण्याचं राहुल गांधी यांचं आश्वासन

उद्योगपतींच्या माफ झालेल्या कर्जांच्या इतका पैसा राज्यातले शेतकरी, कष्टकरी आणि गरिबांना देण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे. गोंदिया इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. आम्हाला अरबपतींचा नाही तर शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, तरुणांचा भारत हवा आहे, असं ते म्हणाले. देशात सर्वाधिक जीएसटी गरीबांच्या खिशातून जातो, असा दावाही त्यांनी केला. 

 

विविध समाज घटकांना देशाच्या निर्णयप्रक्रियेत, तसंच विविध क्षेत्रांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. हा या समुदायांचा सर्वात मोठा अपमान असल्याची टीका त्यांनी केली. जातनिहाय जनगणना आणि आरक्षणावरची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याच्या आश्वासनांचा पुनरुच्चार त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची हमी त्यांनी राज्यातल्या मतदारांना दिली. ही विचारधारेची, राज्यघटनेची लढाई आहे. संविधान हे द्वेषाला प्रेमाने हरवण्याचा संदेश देणारं पुस्तक असल्याचं ते म्हणाले.  

 

तत्पूर्वी, राहुल गांधींची चिखली इथली सभा विमानातल्या तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा