भारतीय जनता पक्ष आदिवासींकडून जल, जंगल, जमीनीवरचा हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सिमदेगा इथं आयोजित प्रचारसभेत आज ते बोलत होते. झारखंडची निवडणूक म्हणजे इंडिया आघाडीचं भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्वज्ञानाविरुद्धचं युद्ध आहे असं ते म्हणाले. जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
Site Admin | November 8, 2024 8:04 PM | Rahul Gandhi
भाजप आदिवासींकडून जल, जंगल, जमीनीवरचा हक्क हिरावून घेत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप
