भारत फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमानं लवकरच खरेदी करणार आहे. या २६ राफेल विमानांपैकी २२ विमानं एक आसनी आणि चार विमानं दोन आसनी आहेत. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार त्याची रचना करण्यात येईल असं संरक्षण सूत्रांनी म्हटलं आहे.
राफेल सागरी विमानांमुळे नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढणार असून ,ही लढाऊ विमानं नौदलाच्या आयएनएस विक्रांत आणि त्यासारख्या विमानवाहू नौकांवर तैनात केली जाणार आहेत. राफेल विमानांमध्ये प्रगत शस्त्र प्रणाली आणि क्षेपणास्त्र असतील.