कुकडी आणि घोड प्रकल्पातून प्रत्येकी चार आवर्तन लाभक्षेत्रातल्या जमिनीला देण्याचा निर्णय आज अहिल्यानगर इथं झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल असं सूक्ष्म नियोजन पाटबंधारे विभागानं करावं, पीक पाहणी नुसार नियोजन करावं, प्रत्यक्षात पिकांचा प्रकार आणि गरज लक्षात घेऊन पाणीपीकाची नोंद नसेल पाणी नाही ही भूमिका घ्यावी लागेल, अशा सूचना विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.