डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 14, 2025 3:11 PM | Rabi Crops

printer

देशातल्या ६३२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड

या हंगामात देशातल्या ६३२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड झाली आहे, असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गव्हाच्या लागवडीत गेल्या वर्षीपेक्षा वाढ झाली असून यंदा ३२० लाख हेक्टरवर गहू लावण्यात आला आहे. डाळींची लागवड १३९ लाख हेक्टरवर तर भरडधान्याची लागवड ५३ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. तसंच ९६ लाख हेक्टरपेक्षा जास्त तेलबियांची लागवड झाली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा