डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

टोकियो इथं आयोजित ‘क्वाड’ परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

जपानच्या टोकियो इथं आयोजित ‘क्वाड’ परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरू आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासह जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. जागतिक पातळीवर आर्थिक वाढ करणं हे एक मोठं आव्हान असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर बदललेले आचार आणि विचार यांचा मेळ साधून ही प्रगती करता येऊ शकते. मानवनिर्मित किंवा नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी सामूहिक पातळीवर प्रयत्नांची आवश्यकता आहे, असं डॉ. जयशंकर या बैठकीवेळी म्हणाले. क्वाड परिषदेतल्या सदस्य देशांवरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे परस्परांमधले संबंध दृढ होण्यासाठी परिपक्व राजकीय समज, आर्थिक भागीदारी, तंत्रज्ञानात सहभाग यामुळे ते साध्य होईल, असंही जयशंकर यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा