भारतातल्या सात संस्थांनी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज आशिया 2025 मध्ये सर्वोच्च शंभरात स्थान मिळवलं आहे. दिल्लीतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटीसह भारतातली दोन विद्यापीठे पहिल्या पन्नासमध्ये तर सात विद्यापीठे सर्वोच्च शंभरात आली आहेत. संपूर्ण खंडामध्ये उच्चशिक्षणात भारताच्या उत्तरोत्तर वाढत्या प्रभावावर यामुळे शिक्कामोर्तब झालं असल्याचं शिक्षण मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यामध्ये भारताची मजबूत शैक्षणिक स्थिती दर्शवणाऱ्या मुंबई आयआयटी 48 क्रमांकावर असून, मद्रास, खरगपूर, कानपूर इथल्या आयआयटी, भारतीय विज्ञान संस्था तसंच दिल्ली विद्यापीठ या संस्थांनी सर्वोच्च शंभर मध्ये स्थान मिळवलं आहे.
Site Admin | November 10, 2024 10:25 AM | Indian institutions | QS World University Rankings