डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधुचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला खेळाडू अग्रमानांकीत पी. व्ही. सिंधुने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर मैदानात काल झालेल्या सामन्यात तिने जपानच्या मनामी सुईझू हिचा २१-१५, २१-१३, असा पराभव केला.

 

उपांत्यपूर्व फेरीत सिंधुचा सामना इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस् टुनजुंग हिच्याशी होणार आहे. याच स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाइराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेदेखील उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा