युक्रेनला लांबवर हल्ला करणारी शस्त्रास्त्रं पुरवून पाश्चिमात्त्य देश रशिया-यूक्रेन संघर्षात थेट सहभागी होण्याचा धोका पत्करत आहेत, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. हा धोका लक्षात घेऊन रशियाला पुढचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असं पुतीन रशियन स्टेट टीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. यूक्रेन रशियावर हल्ला करण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रास्त्रांची मागणी करत असल्याची वृत्त प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यूक्रेनमधल्या युद्धात अमेरिका आणि युरोपीय देशांसह नाटो देशांचा थेट सहभाग असल्याचा निष्कर्ष काढून हा निर्णय घेतला जाईल, असंही ते यावेळी म्हणाले.
Site Admin | September 13, 2024 1:28 PM | Russian President Vladimir Putin | Ukraine Conflict