डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हिंगोलीतले संशोधक पुष्यमित्र जोशी यांची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड

हिंगोली जिल्ह्यातले तरुण संशोधक पुष्यमित्र जोशी यांची भारत सरकारच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जोशी यांचं विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरणीय धोरण आणि सामाजिक कार्यातलं योगदान लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. १५ ते २९ वर्ष वयोगटात विज्ञान, समाजसेवा, नवोन्मेष, नेतृत्व, संशोधन आणि धोरण अशा क्षेत्रात  असाधारण कार्य करणाऱ्या युवक युवतींना, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार  प्रदान केला जाणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा