यंदाच्या पुसा कृषी विज्ञान मेळाव्याचं आयोजन उद्यापासून नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होईल. तीन दिवस चालणाऱ्या या मेळावाची संकल्पना उन्नत कृषी-विकसित भारत अशी आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेनं विकसित केलेल्या नवीन प्रजाती आणि तंत्रज्ञानाचं थेट प्रात्यक्षिक हे यंदाच्या मेळाव्याचं मुख्य आकर्षण असणार आहे.
Site Admin | February 21, 2025 8:06 PM | Pusa Krishi Vigyan Mela 2025
नवी दिल्लीत उद्यापासून पुसा कृषी विज्ञान मेळाव्याचं आयोजन
