डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मंत्री ज्युएल ओराम यांच्या हस्ते पूर्वोत्तर आदिवासी महोत्सवाचं उदघाटन

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथं होणाऱ्या पूर्वोत्तर आदिवासी महोत्सवाचं उदघाटन झालं. ८ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आदिवासी संस्कृतीच्या, कलाकुसरीच्या तसंच  खाद्य पदार्थांच्या जिनसा प्रदर्शित केल्या जाणार असून त्या माध्यमातून या समाजाची संस्कृती जोपासण्याचा तसंच त्यांना  प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रदर्शनात विविध १३ राज्यांचे  प्रतिनिधी सहभागी झाले असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. 

 

आदिवासी व्यवहार मंत्रालय आदिवासीं समाजाच्या वेगवान  विकासासाठी झटत आहे, या समाजाच्या कल्याणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्या व्यतिरिक्त आदिवासी बहुल क्षेत्रात २५ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येणार असल्याचंही  ओराम यांनी यावेळी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा