डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 10, 2025 7:25 PM

printer

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने कापड उद्योगाला चालना देणारे अभ्यासक्रम विकसित करावेत- राज्यपाल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने कापड उद्योग क्षेत्राला चालना देणारे अभ्यासक्रम विकसित करावेत, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. सोलापूर हे कापड उद्योगासाठी महत्त्वाचं केंद्र असून कापड उद्योगाला चालना मिळेल अशा फॅशन डिझायनिंग, बी टेक, बीएससी टेक्स्टाईल, केमिकल आदी अभ्यासक्रमाच्या समावेश करावा असं त्यांनी सांगितलं.

 

विद्यापीठाच्या २० व्या दीक्षांत समारंभात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ७१ संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी आणि ५७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं तर १५ हजार २९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षा निमित्त विद्यापीठामार्फत अहिल्यादेवी यांच्या जीवन चरित्र विषयावरच्या निवडक ५५ चित्रांच्या प्रदर्शनाचं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा