पंजाबमधील एका शिवसेना नेत्याची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगत राय उर्फ मंगा असे त्यांचे नाव असून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मोगा जिल्हा अध्यक्ष होते.
मंगा हे गुरुवारी रात्री घराबाहेर पडले असता त्यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. मात्र, ती गोळी चुकून एका १२ वर्षांच्या मुलाला लागली. त्यानंतर मंगा हे गाडीवरून पळून गेले. मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून पुन्हा त्यांच्यावर गोळीबार केला. जखमी झालेल्या मंगा आणि मुलाला रुग्णालय़ात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येनंतर काही संघटनांनी पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या आरोप करत राज्यातल्या आप सरकारविरोधात निदर्शने केली.