पंजाबमधल्या जालंदर इथं अल्पकालीन चकमकीनंतर दोन कुख्यात गुंडांना पोलिसांनी अटक केली. जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक शर्मा यांच्या गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी पोलीस या दोन गुंडांच्या शोधात होते. हे दोघेही अमेरिकेतल्या एका टोळीसोबत काम करत असल्याची माहिती पंजाबचे पोलीसप्रमुख गौरव यादव यांनी समाजमाध्यमावर दिली. त्यांच्याकडून दोन अत्याधुनिक शस्त्रंही पोलिसांनी जप्त केली आहेत.
तर एका स्वतंत्र कारवाईत फिरोजपूर पोलिसांनी एका अंमली पदार्थ तस्कराला अटक करून त्याच्याकडून तीन अत्याधुनिक शस्त्रं आणि अंमली पदार्थ जप्त केले. पंंजाबमध्ये दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवाया करण्याच्या उद्देशानं ही शस्त्रं सीमेपलीकडून मिळवल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.