पंजाब पोलिसांनी आयएसआय समर्थित नार्को दहशतवादी पद्धतीचा छडा लावत, त्याच्या म्होरक्यासह पाच जणांना अटक केली आहे. बटाला आणि गुरुदासपूर इथल्या दोन पोलिस आस्थापनांवर हँडग्रेनेड फेकण्यातही या पाच जणांचा सहभाग होता. तसंच बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि अन्य दोन परदेशी हस्तक ही टोळी चालवत होते, अशी माहिती पुनाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी दिली आहे.
या पद्धतीचा छडा लावून पंजाबच्या पोलिसांनी विविध जिल्ह्यांतील पोलिस आस्थापनांवरील हल्ल्याच्या सर्व घटनांची उकल केली आहे, असा दावा त्यांनी केला.