आयपीएल क्रिकेटमध्ये काल पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने वीस षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्जला २०१ धावा करता आल्या.
दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस् संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा चार धावांनी पराभव केला. आज संध्याकाळी साडेसात वाजता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांदरम्यान अहमदाबाद इथं सामना होणार आहे.