डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 11, 2024 8:29 PM

printer

मुसळधार पावसामुळं पंजाबच्या अनेक जिल्ह्यांतलं जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळं पंजाबच्या अनेक जिल्ह्यांतलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजचा पाऊस हा या मान्सूनमधला पहिला पाऊस असून  हवामान विभागानं राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकलेल्या गाडीतले ११ जण वाहून गेले. गाडीतल्या प्रवाशांपैकी केवळ एकाला वाचवण्यात यश आलं आहे. वाहून गेलेल्यांचा शोध अद्यापही सुरू असून, त्यांच्यापैकी काही जणांचे मृतदेह सापडले असल्याचं स्थानिक प्रशासनानं कळवलं आहे. गुरुदासपूर जिल्ह्यात रावी नदी भरून वाहत असून भारत-पाकिस्तान सिमेजवळच्या माकोडा पाटणभागातल्या ७ गावांचा संपर्क तुटला आहे.  जालंधर शहरात सखल भागात पाणी साचल्यानं लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा