येत्या तीन महिन्यात पंजाबला अंमलीपदार्थमुक्त बनवण्याचा संकल्प पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी केला आहे. या कालावधीत पंजाबमधून सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांचं उच्चाटन करण्याचे निर्देश त्यांनी सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत दिले. या सर्व मोहिमांवर लक्ष ठेवण्यासाठी ५ मंत्र्यांची समितीही त्यांनी स्थापन केली आहे.
पंजाब पोलिसांच्या ८ हजार कर्मचाऱ्यांनी आज ८०० ठिकाणी छापे टाकले. या कारवाईतून पोलिसांनी २९० अंमली पदार्थांच्या तस्करांना अटक केली आणि २३० FIR दाखल केले.