पंजाबमधे भटींडा इथं आज एक बस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात, सहा जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि जिल्हा पोलिसांनी तातडीनं दुर्घटना स्थळी धाव घेतली. आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं प्रवाशांची सुटका केली. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमधे दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Site Admin | December 27, 2024 7:57 PM | Punjab