अहिल्यानगर इथं झालेल्या 67व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत, पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यानं मानाची चांदीची गदा पटकावली. गादी गटात पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत झाली. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ हा विजेता ठरला. माती गटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड आणि परभणीच्या साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली; त्यामध्ये सोलापूरचा महेंद्र गायकवाड जिंकला. त्यानंतर अंतिम लढत मोहोळ आणि गायकवाड यांच्यात झाली. यामध्ये मोहोळ याने बाजी मारली. केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत ही चांदीची गदा त्याला प्रदान करण्यात आली.