पुण्यात काल रात्री घडलेल्या हीट एन्ड रनच्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोन पोलिस कॉन्स्टेबल्सचा मृत्यू झाला असून एक पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खालील बिटवरचे दोन पोलिस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात एका पोलिस शिपायाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत चिंचवड मधील पोलीस शिपाई पिंपळे सौदागर भागातुन दु चाकीवरुन निघाले असताना आज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
Site Admin | July 8, 2024 1:20 PM | Pune
पुणे : ‘हीट एन्ड रन’च्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोन पोलिस कॉन्स्टेबल्सचा मृत्यू
