डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात ९ जणांचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळी एका टेम्पोनं मिनीव्हॅनला दिलेल्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहा वाजता नारायणगावजवळ घडली. ही मिनीव्हॅन नारायणगावच्या दिशेनं जात असताना पाठीमागून टेम्पोनं धडक दिल्यानं ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिकाम्या बसवर आदळली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.

 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना त्यांनी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा